उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा परिषद उस्मानाबादची सर्वसाधारण सभा मंगळवार दि. १५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू होताच काँग्रेसचे जि.प.सदस्य प्रकाश आष्टे यांनी डिपीडीसी मधून चालू वर्षांत किती निधी प्राप्त झाला. या संदर्भात प्रश्न विचारला यावरून जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी या संदर्भातील निधीची माहिती न आल्यामुळे सभा तहकूब करते, असे सांगून वाकाआऊट केले. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजीकरीत गदारोळ केला. 

जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा मंगळवार दि. १५ रोजी दुपारी १ वाजता आयोजित केली होती. परंतू प्रत्येक्षात सभा सव्वादोन वाजता सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे उपस्थित होत्या. सीईओ राहुल गुप्ता, बांधकाम व अर्थ् सभापती दत्तात्रय देवळकर, कृषी व पशूसंवर्धन सभापती दत्ता साळूंके,  महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे आदी उपस्थित होत्या.  सभा उशीरा सुरू होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या सक्षणा सलगर महेंद्र धुरगुडे आक्रमक  होते. सभेची सुरुवात वंदे मातरम ने झाल्यानंतर सभागृहाचे कामकामज सुरू झाले. काँग्रेसचे जि.प.सदस्य प्रकाश आष्टे यांनी डिपीडीसी मधून चालू आर्थिक वर्षांत बांधकाम, आरोग्य, शिक्षण, लघू पाटबंधारे, ितर्थक्षेत्र, कृषी, समाजकल्याण, पशूसंवर्धन, निती आयोग या सर्व हेडखाली किती निधी प्राप्त झाला. वरील विभागांच्या कामांना प्रशासकीय मान्यता केंव्हा मिळाली. निविदा प्रक्रिया सध्या काय स्थितीत आहे. प्रशासकीय मान्यता देऊन देखील निधी मागणी का केली नाही. १५ वां वित्त आयोग मधील किती निधी खर्च झाला आहे आदी संदर्भात माहिती विचारली. यावर जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी या संदर्भात सर्व सदस्यांच्या मागणीनुसार निधीची मागणी केली आहे, असे सांगून सभा तहकूब केल्याचे सांगितले व अध्यक्षासह कांही पदाधिकारी सभागृहाबाहेर निघून गेले.पदाधिकारी बाहेर निघून जात असताना प्राध्यापक ज्ञानेश्वर गिते, महेंद्र धुरगुडे, सक्षणा सलगर यांनी ही महत्वाची जी.बी आहे.मनमानी कशामुळे , कोणी टोकन घेतले आहे. एकतर ठरवून उशीरा सभा चालू केली. हा सदस्यांचा आपमान आहे. सत्ताधारी असताना उठून गेले, असे कधी झाले नाही, निधीचा प्रश्नांसोबतच इतर कांही विषय महत्वाचे होते. गेल्या अडीच वर्षांत कांही पदाधिकारी व कांही अधिकारी यांची मिलीभगत असल्याची टिका केली. 

१५ची सभा १७ मार्चला

आज होणारी जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा सर्वांच्या मतानुसार १७ मार्चला घेण्याचे ठरले होते. माझ्या दालनात काँग्रेसचे प्रकाश आष्टे, धीरज पाटील, राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे, प्राध्यापक गिते या सर्वांची सहमती होती, असे जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे व बांधकाम व अर्थसभापती दत्तात्रय देवळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


 
Top