उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अर्थसंकल्पामध्ये उस्मानाबाद व कळंब तालुक्यासाठी ४२ कोटी १६ लाख रुपयाचा निधी मिळाल्याची माहिती आमदार कैलास घाडगे-पाटील यानी दिली आहे.रस्त्यासाठी मोठा निधी मिळाल्याने निश्चितपणे वाहतुकीच्या समस्या सोडविण्यात पुढील काळात यश मिळणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार सर्वच पातळीवर जिल्हा समृध्द व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचा विश्वास आमदार घाडगे-पाटील यानी यावेळी व्यक्त केला.   

उस्मानाबाद शहरातील सांजा चौक ते चिखली चौक  या कामासाठी चार कोटी ५० लाख मंजुर केले आहे.(पाटस,दौड,बार्शी,उस्मानाबाद, बोरफळ रस्ता रामा-६८) असा हा मार्ग असणार आहे.सोनेगाव ते कौडगाव (येडशी-सोनेगाव-भानसगाव प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याची सुधारणा करण्यासाठी चार कोटी ७५ लाखाची तरतद केली.राष्ट्रीय महा मार्ग २११ ते आळणी ढोकी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तीन कोटी ४२ लाखाचा निधी दिला आहे.उस्मानाबाद-पोहनेर-बेगडा(उस्मानाबाद- पोहनेर-अपसिंगा-तुळजापूर रस्त्याची सुधारणा करणे- दोन कोटी ८५ लाख रुपये मंजुर केले आहेत. हातलादेवी ते घाटंग्री ते आंबेजवळगा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी एक कोटी ४२ लाख, कळंब-मोहा-येडशी रस्ता सुधारण्यासाठी चार कोटी ५० लाख,कळंब-मोहा-येडशी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी सहा कोटी, उस्मानाबाद जिल्हा सरहद्द आवाड शिरपुरा-शिराढोण-कोल्हेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तीन कोटी ८०लाख, बहुला- इटकूर-मांडवा-बावी- तेरखेडा रस्त्याची सुधारणा करणे एक कोटी ४२ लाख,राज्य मार्ग-२०८ ते मंगरूळ-खामसवाडी रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी एक कोटी ९० लाख,राज्य मार्ग 236 ते सारोळा-इटकूर-हासेगावं रस्त्याची सुधारणा करणे पाच कोटी ७५ लाख, राज्य मार्ग 211 तावरजखेडा कोंड पाडोळी बोरखेडा ते राज्य मार्ग 238 रस्त्याची सुधारणा करणे एक कोटी ९० लाख रुपये अशी तरतुद केली आहे.दोन तालुक्यातील अनेक गावातील महत्वाच्या रस्त्यासाठी हा निधी मिळाला आहे. हा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे आमदार कैलास पाटील यानी आभार व्यक्त केले आहेत.


 
Top