उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद  जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले , महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासह औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना वीज बिलात सवलत दिली जाते. अगोदरच कोरोना महामारी आणि लॉकडाऊन मुळे अनेक छोटे मोठे उद्योग बंद पडले असून अनेक उद्योग हे नवसंजिवनीच्या शोधात आहेत मात्र राज्य सरकारने उद्योजकांना उभारी देणे गरजेचे असताना राज्य शासनाच्या अर्थ विभागाने आवश्यक ती तरतूद अंदाजपत्राकात न केल्याने महावितरणला या अनुदाना पोटी निधी मिळू शकला नाही. त्यामुळे महावितरणने औद्योगिक क्षेत्रातील वीज बीलातील सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब उद्योजकांसाठी अत्यंत चिंताजनक आहे.

 उस्मानाबाद जिल्हा हा निती आयोगाच्या यादीत आकांक्षित जिल्हा म्हणून समाविष्ठ असून या जिल्ह्यामध्ये मोठ्या अडचणीना सामोरे जात काटकसर करत हजारो छोटे मोठे उद्योग चालू आहेत यावर हजारो नागरिकांचे घर चालते मात्र सरकारच्या या धोरणामुळे आता आहेत ते उद्योग बंद पडतील आणि परत हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ हा निर्णय रद्द करुन उद्योजकांना न्याय व दिलासा द्यावा, ही विनंती. अन्यथा आगामी काळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

  निवेदन देताना भाजपचे सुनिल काकडे, संतोष बोबडे, नारायण नन्नवरे , दिपक अलुरे,  प्रदिप शिंदे ,सुशांत भुमकर ,राहुल काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, गुलचंद व्यवहारे, पाडुरंग पवार, ओम नाईकवाडी ,सुजित साळुंके, हिम्मत भोसले,  अमोल पाटील , सचिन घोडके, प्रशांत भोसले हे उपस्थित होते.


 
Top