उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्हा परिषद उस्मानाबादच्या आरोग्य विभागाअंतर्गत अधिकृत संकेतस्थळावरून मिळणाऱ्या माहितीवर ती उमेदवारांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
आरोग्य विभागातील भरती संदर्भात बनावट नेमणूक पत्र दिल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वेगवेगळ्या 90 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवाराला बनावट नेमणूक पत्र पाठवून आर्थिक रकमेची मागणी केल्याचा प्रकार 3 घट झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ही माहिती दिली. यासंदर्भात उस्मानाबाद येथील आनंद नगर पोलीस ठाण्यात बनावट नेमणुक पत्र देणाऱ्या आज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. जिल्हा परिषद उस्मानाबाद आणि आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भरती प्रक्रिया उमेदवारांना माहिती दिली जाणार आहे.त्या माहितीवर लक्ष ठेवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी केले आहे.