परंडा / प्रतिनिधी:-

 तालुक्यातील रोसा हद्दीतील सिमेंट नाला बंधाऱ्याचे काम निकृष्ठ झाले असून याची चौकशी करावी या मागणीसाठी जिल्हा परीषद लघु पाटबंधारे विभाग परांडा कार्यालयासमोर अमरण उपोषण आंदोलनास बसलेले रंगनाथ ओहाळ यांचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे माराठवाडा अध्यक्ष प्रा. डॉ. संजय कांबळे वजिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या मध्यस्थी मुळे स्तगित कराण्यात आले.

   यावेळी कार्यकारी अभियंता चंद्रकांत राऊळ व उपविभागीय अभियंता व्ही.व्हीं  जोशी यांच्या शी भ्रमण ध्वनी वरून चर्चा करून हा प्रश्न लेखी आश्वासन दिल्याने उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.

     यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अमित कदम, विस्तार अधिकारी जयदेव वघे , लघु पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ सह्यक आर.आर माने , कनिष्ठ अभियंता आर.एम ठोंगे , कनिष्ठ लिपिक ए. के. कुलकर्णी ,मा. सरपंच जरीचंद्र गोडगे , दिपक ओहाळ, रविंद्र नलावडे, पिंपळवाडी चे सरपंच भाऊराव ओहाळ , विश्वास लोकरे , अजय बनसोडे , समाधान ओहाळ युवराज गिरी, भालचंद्र ओहाळ  आदी उपस्थित होते.


 
Top