परंडा / प्रतिनिधी-

 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा सुरू झाले असून महाविद्यालयाने परीक्षा कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार व covid-19 च्या नियमानुसार सर्व विद्यार्थ्यांना सूचना देऊन त्यांना महाविद्यालयात परीक्षेसाठी प्रवेश दिला आहे. 

 यावेळी परीक्षा प्रमुख शंकर कुटे यांनी परीक्षा कालावधीमध्ये परीक्षांविषयी सर्व माहिती सांगितली या महाविद्यालयाचा केंद्र क्रमांक 376 असून एकूण  कला वाणिज्य व विज्ञान विभागातून एकूण 453 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रवेशित झालेले आहेत. परीक्षेमध्ये  काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासना कडून संरक्षण मिळालेले आहे. परीक्षेसाठी बहिस्थ परीक्षक म्हणून डी एम गवळे उपस्थित होते. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ महेशकुमार माने, ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख, प्रा संतोष भिसे, प्रा ज्योतिबा शिंदे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 
Top