लोहारा/प्रतिनिधी

कंत्राटी पद्धतीने शिकाऊ कामगार म्हणून कंत्राटदारांला सांगुन कामावर घेतो, असे सांगून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लोहारा शहरातील वीज वितरण कंपनीतील कनिष्ठ लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने दि.3 मार्च रोजी रंगेहाथ पकडले आहे.

 लोहारा तालुक्यातील धानुरी येथील एका तरूणाने वायरमनचा कोर्स केला होता. त्याला नोकरीची आशा होती. त्यानुसार त्याने लोहारा येथील वीज वितरण कंपनीकडे जागा आहे का? अशी विचारणा केली. यावेळी येथील वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेले कनिष्ठ लिपिक अमर शिवाजी पटाडे (वय ३८) यांच्याकडे संपर्क साधला. त्यावेळी पटाडे यांनी संबधीत तरूणाला कंत्राटी पद्धतीने वायरमन ट्रेड शिकाऊ कामगार म्हणून कंत्राटदारांला सांगून कामावर घेतो. मात्र त्यासाठी १५ हजार द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली. त्यावरून संबंधीतांनी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. दि.3 मार्च रोजी सायंकाळी एका हॉटेलमध्ये १५ हजार रूपयाची लाच स्वीकारताना लिपीक पटाडे यांना रंगे हात पकडले. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक अशोक हुलगे, इफ्तकार शेख, सचिन शेवाळे, शिधेश्वर तावासकर, नागेश शेरकर, दत्तात्रय करडे, यांनी कार्यवाही करून लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top