नळदुर्ग / प्रतिनिधी-

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठवाड्यात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली असून खासदार सदाशिव लोखंडे, आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. पक्ष संघटन वाढावे व शिवसेनेने जनतेसाठी केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचवली जात आहेत. शिवसैनिकात या शिवसंपर्क अभियान बाबत उत्साह आहे. नामातराबाबत बोलताना खा. सदाशिव लोखंडे यांनी लवकरच मुख्यमंत्री उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करतील, असे  तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे   सांगितले. 

 उस्मानाबादचे धाराशिव तर औरंगाबादचे संभाजी नगर हे नामकरण उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सरकार करू शकणार नाही, नामंतरण हे उद्धव ठाकरे यांच्या नशिबात नाही. बाळासाहेबांचे नामंतरणाचे स्वप्न हे देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण होणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी काल तुळजापूर येथे सांगत शिवसेनेवर टिका केली होती. त्यानंतर नामांतरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता.

नामंतरण हा शिवसेनेचा अजिंडावरील विषय आहे. शिवसेना पक्षप्रमुख उस्मानाबादचे धाराशिव लवकरात लवकर करतील अशी अपेक्षा उस्मानाबाद करांना आहे असे सांगत नामंतरण लवकर होईल असा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला. शिवसंपर्क अभियानाला उस्मानाबाद जिल्ह्यात सुरुवात झाली असून यात शिवसैनिक सहभागी होत आहेत. नळदुर्ग येथील कार्यक्रमात नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष अक्षय ढोबळे, सुधीर कदम,सोमनाथ गुरव, प्रवीण कोकाटे यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top