उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)  अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनानुसार कडधान्य पीकांचे (हरभरा,तुर,मुग,उडीद इ. ) जिल्हास्तरावर खरेदीदार - विक्रेता संम्मेलनाचे आयोजन  दिनांक 24 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता मध्यवती प्रशासकीय इमारत डी.पी.डी.सी.सभागृह,उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे.

जिल्हयातील कडधान्य पिकांची उत्पादन घेणाऱे शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कपंनी,महिला बचत गट यांना या खेरदीदार - विक्रेता संम्मेलनास त्यांच्याकडील उत्पादीत होणारी कडधान्य पिके मोठया प्रमाणात खरेदी आणि विक्रीचे करार करुन संम्मेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर यांनी केले आहे.


 
Top