वाशी  / प्रतिनिधी-

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि.22) रोजी रात्री 1:30 च्या सुमारास तेरखेडा येथे असणाऱ्या हॉटेल उत्तम समोर भीषण अपघात घडला.ह्या अपघातामध्ये 1 जण जागीच ठार झाला असून अन्य 3 जण गंभीर जखमी आहेत.      

ह्या बाबत अधिक वृत्त असे की, तेरखेडा येथे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळे वर उत्तम हॉटेल समोर ट्रक (क्र.RJ-11 GB-4937) रस्त्याच्या बाजूला उभा होता.दरम्यान ह्यावेळी उस्मानाबादहून भूम कडे जात असलेल्या स्विफ्ट (क्र. MH 14 FG 8677) गाडी ने उभ्या असलेल्या ट्रक का पाठीमागून जोराची धडक मारली. ही धडक एवढी भीषण होती की स्विफ्ट गाडीतील चाकालच्या बाजूच्या सीट वरती बसलेला युवक जागीच गतप्राण झाला.तसेच गाडीतील अन्य 3 जण गंभीर जखमी झाले. 

 काही लोकांच्या मदतीने जखमी झालेल्या लोकांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.मृत पावलेल्या युवकाचे नाव वसीम शेख रा.भूम ( वय 27) वर्ष असून गाडीमध्ये वसीम शेख यांचे आई-वडील होते. तसेच सोबत चालक निखिल नारायण जगताप हे 3 जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार जखमींवर शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे उपचार सुरू आहेत.


 
Top