तुळजापूर  / प्रतिनिधी- 

तालुक्यातील तिर्थ खुर्द येथील २९ वर्षिय शेतकऱ्याने स्वताचा शेतात जावुन लिंबाचा झाडास नायलाँनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि.१० रोजी दुपारी दीड वाजत उघडकीस आली.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, महादेव निलप्पा जमदाडे २९ (रा. तिर्थखुर्द ) हा सकाळी 8.30 वाजता  शेतात शेतीला पाणी देतो म्हणून शेतात  गेला दुपारी दीड वाजण्याचा सुमारास शेतातील लिंबाचा झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मयत महादेव जमदाडे याने काही काळ शिक्षक म्हणून काम केले  होते. त्यानंतर मागील पाच सहा वर्षा पासुन शेतीतच काम करीत होता तो बीएससी झाला होता त्याचा पश्चात आईवडील भाउ बहीण असा परिवार आहे त्याचा आत्महत्या चे नेमके कारण अधाप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी सुनिल केराप्पा जमदाडे याने दिलेल्या फिर्याद वरुन पोलिसांनी अकस्मात मुत्यु म्हणून गुन्हा नोंद केला आहे.

 
Top