तेर /प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे दोन दिवशीय आयोजित करण्यात आलेल्या तेर महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. श्रीकांत हारकर यांनी केले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पर्यटन संचालनालय उपसंचालक प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने 26 व 27 मार्च रोजी तेर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तेर महोत्सव संदर्भात तेर ग्रामपंचायतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत  डॉ.श्रीकांत हारकर यांनी उपस्थितांना तेर महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी पर्यटन विभागाचे सहाय्यक उपसंचालक जाधव, ढोकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर राऊत ,मंडळ अधिकारी  अनिल तीर्थकर, तलाठी प्रशांत देशमुख, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी , तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी ह .भ .प. दीपक खरात,कै. रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे, गोरोबा पाडूळे ,तय्यबअली शहा, महादेव भंडारे ,मज्जित मनियार, अमोल थोडसरे, इर्शाद मुलांनी ,सुभाष कुलकर्णी, केशव वाघमारे, विठ्ठल कोकरे, बाळासाहेब रसाळ आदी उपस्थित होते.

 
Top