उस्मानाबाद / प्रतिनिधी-

संपूर्ण भारतात  उस्मानाबाची मान अभिमानाने उंचविणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.कमल कुंभार यांना जागतिक महिला दिनी केंद्र शासनाच्या वतीने दिला जाणारा नारीशक्तीपुरस्कार राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात महामहिम राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पशुपालन,कुक्कुटपालनतसेच सौरऊर्जा उपकरणांद्वारे त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविला आहे. त्यांना नीती आयोगाच्या “वुमन ट्रान्सफार्म” तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या “इक्वेटर” पुरस्काराने यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे.

 भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अर्चनाताई अंबुरे, भाजपाच्या मा. नगरसेविका राणीताई पवार, भाजपा महिला मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष विद्या माने, सिंधु जाधव, जिल्हा सरचिटणीस वर्षाताई पाटील, भाजपा युवती मोर्चा जिल्हाध्यक्ष पुजा राठोड इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. 

 
Top