तुळजापूर/  प्रतिनिधी-

 पालिकेचे नूतन मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी तुळजापूर खुर्द येथील नगर पालिका शाळेस भेट दिली. यावेळी मुख्याधिकारी नातू यांनी शाळेतील संगणक कक्ष, मिनी प्रयोगशाळा, इंटरॅक्टिव बोर्ड ,ऑनलाइन शिक्षण, गांडूळ खत निर्मिती,परसबाग, सेंद्रिय खत निर्मिती आदी विविध उपक्रमांचे पाहणी करून माहिती घेतली.

प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मोटे यांनी मुख्याधिकारी नातू यांचे स्वागत केले. या वेळी नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी मुख्याधिकारी नातू यांनी प्रत्येक वर्गाची गुणवत्ता तपासणी केली. विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदी कविता सअभिनय सादर केल्या. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या समवेत प्रश्नांच्या माध्यमातून उत्तरे तपासून विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि आकलन तपासले. या वेळी सहशिक्षक अशोक शेंडगे, सतीश यादव, बालाजी साळुंके, विश्वजीत निडवंचे, निर्मला कुलकर्णी, यास्मिन सय्यद आदी शिक्षक - शिक्षिकांची उपस्थिती होती. तुळजापूर खुर्द येथील नगरपालिका शाळेस नूतन मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी भेट दिली.

 
Top