मुरुम  (प्रतिनिधी) :

 चिंचोली भुयार (ता. उमरगा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालकांसाठी खरी कमाई हा उपक्रम   साजरा करण्यात आला. हा उपक्रम लक्ष्मण बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरवसे येण्यात आला.

 यावेळी सुरेश सुरवसे, मोहन कांबळे, राजकुमार रामतीर्थे, संगीता राठोड, उषा सोनवणे, भाग्यश्री पंडीत आदींच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. इयत्ता ८ वी वर्गातील कुमारी श्रुती साखरे हिने सर्वात जास्त पहिल्या क्रमांकावर कमाई, विराट गायकवाड याने दोन क्रमांक तर राधा पाटील तिसऱ्या क्रमांकावर कमाई केली. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. 

या कार्यक्रमात इ. १ ली ते ८ वी पर्यंतचे मुले-मुली सहभागी होते. सर्वांनी खूप मेहनत घेऊन काम केले. सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दगडू  गायकवाड, सरपंच रणजित गायकवाड, ग्रामविकास अधिकारी हंगरगे, पोलिस पाटील, दत्ता चौधरी आदींसह गावकऱ्यांनी व शिक्षकांनी या विद्यार्थ्याचे कौतुक केले.

 
Top