उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील विठ्ठलवाडी (तेर) व वरुडा येथे जागतिक महिला दिन हा कार्यक्रम झुआरी अॅग्रो   केमिकल लिमिटेड व स्वंयम शिक्षण प्रयोग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यामानाने साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सौ. सुजाता पाटील यांनी केले. झुआरी कंपनीचे विक्री प्रतिनिधी अक्षय सावंत यांनी महिलांचे शेती मधील योगदानाबद्दल आभार मानले. तसेच माती परीक्षण करून घेण्याचे   अावाहन केले. झुआरी अॅग्रो केमिकल लिमिटेड या कंपनी मार्फत सौ. सुजाता पाटील, गीता चव्हाण आणि ज्योती गाढवे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विशाल कदम जय किसान सल्लागार व बळीराजा कृषी शेतकरी गट मधील महिला उपस्थित होत्या.

 
Top