लोहारा/प्रतिनिधी

हिंदु-मुस्लिम धर्माचे श्रध्दास्थान असलेल्या लोहारा तालुक्यातील मार्डी येथील हजरत ख्वॉजा जैनुद्दीन चिस्ती रहे. उर्फ जिंदावली यांच्या 696 व्या ऊरूसास सुरुवात झाली आहे. या तिन दिवस चालणाऱ्या उरुसात मार्डी येथील दर्ग्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 लोहारा शहरातून सायंकाळी सात वाजता तहसीलदार संतोष रुईकर यांच्या डोक्यावर मानाचा संदल देऊन मिरवणूक काढण्यात आली. या संदल मिरवणुकीत इब्राहीम हेड्डे, नागाण्णा वकील, चंद्रकांत पाटील, शब्बीर गवंडी, उपनगरध्यक्ष आयुब हबीब शेख, अभिमान खराडे, चॉद हेड्डे, आजिम हेड्डे, वहाब हेड्डे, आयुब अब्दुल शेख, जावेद हेड्डे, नगरसेवक अविनाश माळी, दिपक रोडगे, ओम कोरे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शहर प्रमुख सलिम शेख, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, नगरसेवक अमिन सुंबेकर, बांधकाम व अर्थ समिती सभापती गौस मोमिन, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, इकबाल मुल्ला, अश्फाक शेख, वजिर मनियार, जमिर हेड्डे, नयुम सवार, हब्बीब हेड्डे, आरीफ हेड्डे, शकील शेख, वजीर आत्तार, यांच्यासह आदी उपस्थित होते. 

 
Top