उस्मानाबाद / प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथ्ून दर्शन घेऊन हैद्राबादच्या दिशेने जाणारी भाविकांची कार उस्मानाबाद शहरातील तेरणा आयटीआयसमोर राष्ट्रीय महामार्गावर पलटी झाली. ही घटना मंगळवारी घडली. या अपघातात लहान मुलांसह पाचजण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जिल्हारूणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

त्र्यंबकेश्वर येथ्ून दर्शन घेऊन भाविकांची कार हैद्राबादच्या दिशेने जात होती. ही कार उस्मानाबाद शहरातील तेरणा कॉलेज समोर पाण्याच्या टाकीजवळ आली असता पलटी झाली. यामध्ये कारमधील लहान मुलांसह पाचजण जखमी झाले. जखमींना तात्काळ उपस्थित नागरिकांनी व वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याँनी रूग्णवाहिका बोलावून जिल्हा रूग्णांलयात दाखल केले. या अपघाताची पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 


 
Top