परंडा / प्रतिनिधी -
तालुक्यातील पिंपरखेड येथे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते गुरुवार दि.१७ रोजी (नाफेड) FCI अंतर्गत शासकीय आधारभूत खरेदी योजना हंगाम २०२१-२२ या खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील ॲड. जहीर चौधरी, ॲड. गणेश खरसडे, उद्योग आघाडीचे हनुमंत पाटील, जोतीराम आबा क्षिरसागर, विठ्ठल तिपाले, नंदकुमार पाटील, ॲड. तानाजी वाघमारे, निशिकांत क्षिरसागर, राहुल जगताप अमोल गोफणे, विलास खोसरे,अरविंद रगडे विवेक शिंदे स्वानंद पवार सुदाम कापसे बाळासाहेब गिरी, शिवाजी पाटील, साहेबराव पाडुळे, दादासाहेब गुडे महादेव बारस्कर, किरण देशमुख, पोपट सुरवसे, ब्रम्हदेव उपासे, श्रीमंत शेळके, अशोक खैरे, राज रगडे, बापु मांडवे, नरसिंग खैरे, अंबादास खैरे, नाना सुर्यवंशी, प्रकाश जाधव, विकास गायकवाड तसेच भाजपा कार्यकर्ते व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.