उस्मानाबाद / प्रतिनिधी-   

 बारा बलुतेदार महासंघाचे राज्य संपर्क कार्यालय उस्मानाबाद येथे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकित ओबीसी, व्हिजेएन्टी,राज्यव्यापी परीषद व मेळावा सांगली येथे आयोजित कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.

याबैठकित कल्याण दळे ची ओ बी सी व्हि जे एन्टी परिषद महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी निवड तर धनंजय   शिंगाडे यांची राज्य समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष हंबीरे ,  कळंबचे माजी नगराध्यक्ष पांडूरंग कुंभार  यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात सतिश कसबे,डि एन कोळी,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य युवक उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,बारा बलुतेदार महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष युवराज शिंदे,शिवानंद कथले.धनंजय राऊत,बप्पा मैंदाड यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास आबासाहेब खोत,सतिश कदम,संजोग पवार,नंदू कुराडे,दत्ता भालेकर,प्रेमचंद गोरे,बापु सुरवसे,मुन्ना मंडाळे,व्यंकट पवार,कृष्णा भोसले,दाजी आप्पा पवार,किशोर राऊत,मच्छिंद्र कांबळे,शंकर गोरे,प्रविण मंडलिक,सचिन पवार,आप्पा वाघमारे,रवि राऊत,फुलचंद गायकवाड,विधाते,अँड उस्मान मोरवे,सुत्रसंचालन व प्रास्ताविक नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले.

 
Top