उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पुणे येथे २१ ते २३ एप्रिल दरम्यान होत असलेल्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्याचा संघ जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष प्रा. भरत जगताप, सचिव योगेश थोरबोले व तांत्रिक समिती प्रमुख संजय कोथळीकर यांनी जाहीर केला आहे.

उस्मानाबाद येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे २७ ते २८ मार्च दरम्यान झालेल्या जिल्हास्तरीय वरिष्ठ गट ऍथलेटिक्स स्पर्धा व निवडचाचणीतून हा संघ जाहीर केला आहे.

उस्मानाबाद जिल्हा संघात १०० मी धावणे मुलात सुमित कदम, देव कांबळे, मुलीमध्ये - शुभांगी मते, अंजली भोसले, २०० मी धावणे मुलीत - ऐश्वर्या करदुस,संध्या क्षिरसागर, निकिता वायकर, ४०० मी धावणे - विशाल जाधवर, प्रथमेश चव्हाण, निकिता गायकवाड व पल्लवी साळवे, ८०० मी धावणे  -  अखिल जाधव, मीट रेकॉर्ड मध्ये श्रीराम पाडुळे, दीक्षित रिटे, बालिका चव्हाण, १५०० मी धावणे - अखिल जाधव, रितेश धोत्रे, लक्ष्मी गुंजोटे, ५००० मी धावणे - तानाजी लेंडवे, अजय वडवले, योगिनी साळुंके, गुजोटे लक्ष्मी, १०००० मी धावणे - योगिनी साळुंके, मीट रेकॉर्ड - ऐश्वर्या भोंडवे, महादेव पेठे, 100H-प्रणिता जाधवर, भाला फेक-सोनाली पवार, मीट रेकॉर्ड राधा गोरे, विवेकानंद तुपे, अक्षय गरड, थाळी फेक- शितल पवार अंजली भोसले, 100 रिले मुली व मुले -दिशा करिअर अकादमी

4*400मी रिले मुले व मुली-दुसरा- श्री करिअर अकॅडमी, ३००० मी स्टिपल चेस - शुभम वाघ, लांब उडी - अमोल चव्हाण,विशाल क्षीरसागर आदींचा समावेश आहे.जिल्हा संघाचे प्रशिक्षक- सचिन पाटील,रोहित सुरवसे,माऊली भुतेकर, प्रशांत बोराडे आदींचा समावेश आहे

 
Top