उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आठव्या सत्राच्या शुन्य प्रहारामध्ये बोलताना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या पात्रतेसाठी असलेल्या जाचक अटींमुळे अनेक पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात या विषयाकडे लोकसभेचे अध्यक्ष तसेच सरकारचे लक्ष्‍ा वेधण्याचे काम शुन्य प्रहारामध्ये बोलतान खा. ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे. 

प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेमुळे हजारो बेघरांना घर देण्याचे सत्कार्य शासनाने केले आहे. मात्र काही तफावतींमुळे आणि जाचक अटी व शर्तींमुळे अनेक गरजूवंत नागरीक या योजनेच्या लाभापासून वंचीत राहत आहेत. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करताना अनेक जाचक अटी-शर्ती यांची पुर्तता करावी लागते. या योजनेंतर्गत मंजुर घरकूलांच्या आणि लाभार्थ्यांच्या आकडेवारीचा विचार करता घरकुलासाठी अर्ज केलेल्यापैकी केवळ 20 ते 25 टक्के अर्जदारांचे घरकूल मंजूर होतात.

या सर्व बाबींचा अभ्यासपूर्ण आणि बारकाईने अभ्यास केला असता, देश भरामध्ये घर नसलेल्या प्रत्येकाला घर मिळावे या उद्देशाने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेच्या सुरु असलेल्या अधिवेशनात शुन्य प्रहाराच्या माध्यमातून या प्रश्नाबाबत आवाज उठवून या जाचक अटी आणि कठोर नियम रद्द करून यामध्ये शिथीलता करण्याबाबतची मागणी केली. ही योजना अत्यंत महत्त्वकांक्षी असून या योजनेची समाजहीताचा विचार करून आणि कल्याणकारी पद्धतीने अंमजबजावणी केली तर देशामध्ये एकही कुटुंब बेघर राहणार नाही असेही यावेळी खा.राजेनिंबाळकर यांनी संसदेत सांगीतले.

 
Top