उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोरील व एल आय सी ऑफिसच्या बाजुने जाणार्या चौकास राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज चौक असे नामकरण सोहळा रविवार दिनांक 6 मार्च   रोजी सायंकाळी 6 वाजता माजी मंत्री तथा अखिल भारतील तैलिक महासभा नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त आण्णा क्षिरसागर,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील,महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे प्रदेश अध्यक्ष विजय भाऊ चौधरी,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,गुरूवर्य ह.भ.प.महादेव महाराज तांबे आळणीकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून  विश्वास शिंदे माजी अध्यक्ष कॉग्रेस आय पार्टी,संजय देशमुख संचालक मध्यवर्ती बँक उस्मानाबाद,हरिकल्याण येलगट्टे मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद,बालाजी पाटील नुतन संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक उस्मानाबाद,विजयभाऊ संकपाळ युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघ यांच्या उपस्थित तसेच प्रमुख उपस्थिती धनंजय नाना शिंगाडे राज्य उपाध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ,पांडुरंग कुंभार माजी नगराध्यक्ष कळंब,दतात्रय बंडगर माजी नगराध्यक्ष उस्मानाबाद,मसुद शेख प्रदेश सचिव अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी,खलिल सर जिल्हा कार्याध्यक्ष कॉग्रेस पार्टी,आयज   शेख शहराध्यक्ष राष्टरवादी कॉग्रेस पार्टी,कोंडाप्पा कोरे माजी जिल्हा परिषद सदस्य,नादेर उल्ला हुसेनी माजी नगर सेवक,दुर्गाप्पा पवार माजी नगर सेवक,नागजी भाऊ नान्नजकर तेली समाज जिल्हाध्यक्ष बार्शी,रामचंद्र गाताडे गुरूजी बीड तेली समाज संघटनेचे नेते,विश्वनाथ खडके जिल्हाध्यक्ष तेली समाज संघटना लातुर,लक्ष्मण माने जिल्हाध्यक्ष नाभिक महामंडळ उस्मानाबाद,अविनाश मार्तंडे जिल्हाध्यक्ष तेली समाज सोलापुर,नितिन शेरखाने राज्य युवक उपाध्यक्ष चर्मकार महासंघ,आबसाहेब खोत सरचिटणीस समता परिषद महाराष्ट्र राज्य,संजोग पवार जिल्हाध्यक्ष घिसाडी समाज उस्मानाबाद,महादेव माळी जिल्हाध्यक्ष समता परिषद उस्मानाबाद यांच्या प्रमुख उपस्थित असणार आहे.

 या कार्यक्रमात संताजी जगनाडे महाराज यांच्या चरीत्राचे व कार्याचे पुस्तक वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.तसेच दुपारी 3 वाजता जयदत्त आण्णा क्षिरसागर यांच्या उपस्थितीत तेली समाजातील पदाधिकारी व समाज यांची सर्किट हाऊल शिंगोली येथे विविध विषयावर बैठक होणार आहे तरी या कार्यक्रमास सर्व समाज बांधव पदाधिकारी यांची उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांनी केले आहे.

 
Top