उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपाटी, उस्मानाबाद येथील आर. पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय मध्ये बी. फार्मसी व डी फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.प्रतापसिंह जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये बी. फार्मसी साठी इम्पॅक्ट ऑफ लॉकडाउन ऑन स्टुडन्ट लाइफ अंड एज्युकेशन, फार्मकोविजीलन्स प्लॅन ऑफ इंडिया, आर्टिफिशियलइंटेलिजन्स इन फार्मा इंडस्ट्री, अनसंग हिरोज ऑफ फ्रीडम स्ट्रगल तर डी फार्मसी साठी फार्मसिस्ट फ्रन्टलाइन हेल्थ प्रोफेशनल, कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमन्स इन फ्रीडम स्ट्रगल, पेशंट कौन्सलिंग ड्यूरिंग डिलेवरी ओटीसी प्रॉडक्ट हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून डी. फार्मसी साठी 65 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर बी फार्मसी साठी 86 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. 

या स्पर्धेदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवले. या स्पर्धेमध्ये बी.फार्मसी विभागातून कु. पायल गुप्ता, लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खारघर या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावला, दुतिय क्रमांक दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी लातूर ची विद्यार्थिनी प्रज्ञा सागर हिने पटकावला तर तृतीय क्रमांक शिंदे आरती, डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे डिग्रज या विद्यार्थिनी पटकावला. डी फार्मसी विभागातून प्रथम क्रमांक कु. श्रद्धा पटले, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक डिपार्टमेंट ऑफ फार्मसी अमरावती, दुतिय क्रमांक कु. शेख झायेद, आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसी उस्मानाबाद तर तृतीय क्रमांक कु. भावेश कुमावट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कल्याण या विद्यार्थ्यांनी पटकावला. या स्पर्धेसाठी कॉर्डिनेटर म्हणून प्रा. असलम तांबोळी सर प्रा. डोके मॅडम प्रा. लोंढे मॅडम कॉकनवेर प्रा. सुबोध कांबळे सर यांनी काम पाहिले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे विश्वस्थ डॉ. वेद प्रकाशजी पाटील, डॉ. प्रतापसिंह जी पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 
Top