उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक हा रस्ता सुस्थितीत करून द्या अथवा रस्त्याची दुरूस्ती करून द्या, या मागणीसाठी या भागातील नागरिक आज आक्रमक झालेले पहायला मिळाले. उस्मानाबाद नगर पालिकेत येऊन नागरिकांनी घोषणाबाजी करत मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्याकडून येत्या १० मार्च पर्यंत रस्त्याची दुरूस्ती करून देतो, असे लिखित आश्वासन घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शहराचा भाग असलेल्या जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक या रस्त्याचे बऱ्याच वर्षांपासून काम रेंगाळले होते. त्यानंतर परवा भूमीगत गटार योजना, उस्मानाबादसाठी मंजूर झाल्याने भूमीगत गटारी झाल्यानंतरच रस्ते चांगले करा, अशी सूचना आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते दुरूस्ती अभवी खड्यात आहेत. जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक या भागातील नागरिकांनी कांही महिन्यापुर्वी उपोषण करून या रस्त्यावरील खड्डे बुजवून घेतले होते. त्यानंतर या भागातील नागरिकांना रस्त्यावरील वाढत्या धुळीमुळे श्वसनाचे आजार होऊ लागल्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण पसरले होते. अखेर शुक्रवार दिंनाक ४ मार्च रोजी या भागातील नागरिकांनी नगर पालिकेत जाऊन घोषणाबाजी करत मुख्याधिकारी यांची भेट घेतली. 

 
Top