उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद पंचायत समिती येथून सेवानिवृत्त झालेले महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त विलास शरणार्थी यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ रविवार दि. ४ मार्च रोजी संपन्न झाला.
उस्मानाबाद शहरातील गवळीवाडा येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसटी कामगार संघठनेचे नेते पंडित पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणुन नागनाथ बदुले, सी.एम आळंगे, सूर्यकांत आरबळे, कमलाकर पवार, टी.आर पाटील, आर.एस कट्टे, सुनील तुपे,तानाजी पाटील, प्रा. बी.एम.कांबळे, प्रा. पी.ए.बंडगर, एसबीआय बँकेचे ए.एन चव्हाण, आर.एस सागुंळे, चंद्रकांत लोहार, डी.व्ही.जोगी, प्रा.आण्णासाहेब घुगे, प्रा.सी.एस चामे, पत्रकार सुभाष कदम-पाटील, मुख्याध्यापक आर.एल मारकड, प्राशांत गरड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामसेवक शरणार्थी यांना शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेल होता. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये खुदावाडी हे गांव राज्यात पहिले आले होते. स्मार्ट व्हिलेज पुरस्कार लोहगांव (ता. तुळजापूर) जिल्हयात प्रथम, वडगाव सिध्देश्वर तंटामुक्त गांव पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात मिळालेले आहेत. त्यांची २९ वर्षे सेवा झाली असून त्यांनी १८ गावात सेवा दिली आहे. त्यांना कामाबद्दल विशेष चार वेतनवाढी मिळालेल्या आहेत. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा.बी.एम कांबळे यांनी केले. लिंगराज शरणार्थी यांनी आभार मानले.