उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय संविधान मनुष्याला जगायला शिकविते, संविधानाचे वाचन केले असता समोरील व्यक्तीला नम्रपणे, सामंजस्य पणाने उत्तर देता येते,आजच्या घडीला देशातील परिस्थिती पाहता  संविधानाची गरज आहे,त्यांचे जतन केले पाहिजे, संविधान संवर्धनासाठी जळगाव येथील युवक मुकेश राजेश कुरील यांनी दि.२७ फेब्रुवारी जळगाव येथुन सायकल रॅली काढली असुन महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात जाऊन संविधान विषयी जनजागृती करित आहेत,आज रोजी उस्मानाबाद येथे आले असता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी निवेदन देण्यात आले तर त्यांनी ही काळजी घेत प्रवास करत रहा असे म्हटले,यात प्रामुख्याने जनता बॅंकेचे संचालक आशिष मोदाणी, अग्निवेश शिंदे,प्रा. राम चंदनशिवे दादा,अंकुश उबाळे, प्रमोद चंदनशिवे,अशोक बोराडे,गणेश रानबा वाघमारे, राजरत्न शिंगाडे,संपत शिंदे, संग्राम बनसोडे, दादासाहेब जेटिथोर,राजाभाऊ जानराव,बाबासाहेब बनसोडे, अविनाश नन्नवरे,रोहन शिंगाडे,संतोष कुंभार,अन्य इतर उपस्थित होते.

 
Top