उस्मानाबाद / प्रतिनिधी

जिल्हा परिषद उस्मानाबादची १५ मार्च रोजी अर्धवट ठेवलेली सर्वसाधारण सभा गुरूवार दि. १७ मार्च रोजी घेण्यात आली. शेवटी ही सभा शांततेत चालेल, असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प.सदस्या सक्षणा सलगर, महेंद्र धुरगुडे, प्रा.ज्ञानेश्वर गिते यांनी रिमोट कंट्रोल,उद्घाटन, टक्केवारी हे शब्द वापरल्यामुळे  सभेत गदारोळ झाल्याचे पहावयास मिळाले.

जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अर्धवट ठेवण्यात आलेली सर्वसाधारण सभा दि.१७ मार्च रोजी गुरूवारी दुपारी घेण्यात आली. या सभेस मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, प्रकल्प अधिकारी प्रांजल शिंदे, नितिन दाताळ, उपाध्यक्ष धनंजय सावंत, बांधकाम व अर्थसभापती दत्तात्रय देवळकर, महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, समाजकल्याण सभापती दिग्वविजय शिंदे, कृषी व पशूसंवर्धन सभापती दत्ता साळूंके, व्यासपीठावर उपस्थित होेते. सभा सुरू होताच सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांचे स्वीय सहाय्यक सभागृहात उपस्थित राहिल्याबद्दल आक्षेप घेतला. त्यावेळी अध्यक्षांनी संबंधितास बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर अध्यक्षा कांबळे यांनी सक्षणा सलगर यांना संरक्षणासाठी देण्यात आलेले. पोलिस यांना ही बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर सभेचे कामकाज एक ते दीड तास शांततेत चालू होते. यावेळी धीरज पाटील महेंद्र धुरगुडे, उद्धव साळवी, रफिक तांबोळी, ज्ञानेश्वर गीते यांनी ज्या शाळेची जागा रस्त्यामध्ये गेली आहे. तेथील मावेजा मिळविण्यासाठी काय प्रयत्न झाले. त्याच प्रमाणे कांही संस्थाचालक बोगस कर्मचारी दाखवून वेतन उचलले जात आहे. त्या संदर्भात काय कारवाई केली. हे प्रश्न विचारले. त्यावर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी कांही विषय न्यायालयात आहेत. तर कांही विषयी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले आहेत. एका संस्थे प्रकरणी िशक्षणाधिकारी चौकशी करतील असेही सांगितले. पुरग्रस्त निधीबाबत धुरगुडे यांनी विचारल्यानंतर अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी सदर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता चौकशी करत आहेत. त्यानंतर संबंधिता विरूध्द कारवाई होईल असे सांगितले.

टक्केवारीशिवाय काम नाही-

 या सभेत महेंद्र धुरगुडे  व नेताजी पाटील, सक्षणा सलगर, धीरज पाटील, उद्धव सांळवी यांनी शासनाच्या अनेक योजना चांगल्या आहेत. परंतू ५६ योजना ग्रामीण भागापर्यंत जात नाहीत, अधिकारी व कर्मचारी ग्रामीण भागापर्यंत योजना जाण्यासाठी विशेष प्रयत्न करीत नाहीत, त्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षण शिबीर घ्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर महेंद्र धुरगुडे, एमआरजीएसमधुन देण्यात येणाऱ्या विहिरी, शेतरस्त्यांसाठी कांही अधिकारी लाच घेत असल्याचे सांगितले. तर याच वेळेस प्राध्यापक गिते यांनी बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात टक्केवारीचा खेळ चालू असल्याचे संागून आपण तक्रार करून देखील खराब झालेल्या कामाची चौकशी केली जात नसल्याचा आरोप केला. त्यावर महेंद्र धुरगुडे यांनी हजारो रुपये पगार असताना लाच कशासाठी घेतात, असा प्रश्न उपस्थित केला. 

सीईओने घेतला निरोप 

विभागीय आयुक्तांची बैठक असल्याच्या कारणावरून मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सभेचा निरोप घेत या नऊ महिन्याच्या काळात बरेच कामे करण्यांची संधी मिळाली. त्याच प्रमाणे कांही चांगले अनुभव ही मिळाले, असे सांगून सभागृहाने घेतलेल्या निर्णयाची आपण निश्चित अंमलबजावणी करू, असे सांगितले. 

आणि गोंधळास सुरुवात झाली

यावेळी सभेत दत्तात्रय देवळकर यांनी गितेच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंत्राटदारांनी चांगले काम केले नाही तर त्यांचे डिपॉझीट आपल्याकडे असते. त्याच प्रमाणे बांधकाम विभागातील एखाद्या अधिकाऱ्यावर विना-चौकशी कारवाई कशी करायची, असे सांगून चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. ग्रामीण पाणीपुरवठ्या संदर्भात कोणतेच काम पुर्णत्वास न गेल्याचे सांगून श्रीमती पवार, सक्षणा सलगर यांनी गुत्तेदार जगविण्यासाठी कामे केली जातात का ? असा प्रश्न उपस्थित केला. तर संदीप मडके, उषा यरकर यांनी किती शाळांना कंपाऊड वॉल नाहीत याचा अहवाल तयार करण्याची मागणी केली. यावेळी नेताजी पाटील यांनी शेतरस्त्याच्या कामासंदर्भात सांगताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर चांगले भडकले. त्यानंतर सक्षणा सलगर यांनी महिला अध्यक्षा असताना चांगले काम केले, असे सांगून आपण कोणाचे तरी रिमोट कंट्रोल आहोत, असा उल्लेख करताच अध्यक्ष यांनी रिमोट कंट्रोल शब्द मागे घ्या, मी सक्षमपणे जिल्हा परिषद चालविली आहे, असे सांगून महिलांच्या प्रश्नाकडेपण चांगल्या पध्दतीने लक्ष दिल्याचे सांगितले. यावर सक्षणा सलगर यांनी शब्द मागे घेणार नाही, असे सांगताच प्राध्यापक गिते यांनी सलगर म्हणतात ते खरे आहे, असे सांगितले तर या गोंधळातच महेंद्र धुरगुडे यांनी माझ्या जि.प.गटातील मी केलेल्या कामाचे उद्घाटन मला न विचारता कोणी केले, असे म्हणत आक्षेप घेतला यामुळे पुन्हा गोंधळास सुरुवात झाली. शेवटी सभापती दत्ता साळूंके यांनी खाली येऊन काका शांत रहा, असे म्हणत धुरगुडे यांना विनंती केली. त्यानंतर शेवटी सभा असल्यामुळे कांही जि.प.सदस्यांनी अधिकारी व सभागृहाचे कौतुक करणारे भाषणे केली. सभागृहातील गोंधळाचे कांही पत्रकार छायािचत्रण करीत असताना नेताजी पाटील यांनी त्यांना छायाचित्रण करण्यास अडथळा आणण्यासाठी परवानगी आहे का असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे पत्रकारांनी नेताजी पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध केला व निषेधाचे पत्र जि.प.अध्यक्ष यांच्याकडे देण्यात आले.

 
Top