उस्मानाबाद / प्रतिनिधी-

“आत्मनिर्भर भारत पॅकेज” अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME)” राज्यात 2020-21 पासून राबविण्यात येत आहे. ही योजना “एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP) याआधारावर राबविली जात आहे. या योजनेशी संबंधित एक दिवसीय कार्यशाळा नुक्तीच घेण्यात आली.या कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद मिळाल.

 या कार्यशाळेकरीता प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला आर्थिक विकास महामंडळ प्रतिनिधी आणि जिल्हा अग्रणी बँक अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, जिल्हयातील उद्योजक, इच्छुक लाभार्थी, महिला बचत गट, बैंक अधिकारी,शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, योजनेच्या संलग्न विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 कार्यशाळेस उपस्थित असलेल्या लाभार्थीना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचे राज्यस्तरीय समन्वयक सत्यवान वराळे यांनी योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर योजनेमधील तांत्रिक बाबींबाबत कृषी उपसंचालक तथा योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी अभिमन्यु काशीद यांनी मार्गदर्शन केले. अर्ज प्रक्रिया तसेच त्यावरील पुढील कार्यवाही याबाबत जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

 या कार्यशाळेमध्ये लाभार्थी आणि यानंतर महिला बचत गटांचे कर्ज प्रकियेमधील अडचणीबाबत बँकेचे अधिकारीमार्फत शंका निरसन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांनी योजनेमधील लाभार्थींना योजनेची संकल्पना तसेच प्रकल्प राबविताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले आणि मोठया प्रमाणात लाभार्थ्यांना योजनेमध्ये सहभाग नोंदवावा आणि योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

 
Top