उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शासन अधिसूचनेव्दारे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही नवीन योजना 2021-22 या आर्थिक वर्षापासून उस्मानाबाद जिल्हयातील तीन महसुली उपविभागामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे राबविण्यात येणार आहे.या गोशाळांची अनुदानासाठी निवड करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.त्यानुसार उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी, कळंबचे उपविभागीय अधिकारी आणि उमरग्याचे उपविभागीय अधिकारी या महसूल विभागात ही योजना राबविण्यात येणार आहे.

  या योजनेअंतर्गत पशुधनासाठी नवीन शेड बांधकाम चारा आणि पाण्याची व्यवस्था, कडबाकुटटी यंत्र,मुरघास प्रकल्प,गोमुत्र आणि शेणावरील प्रक्रिया प्रकल्प इ.बाबीसाठी अनुदान मिळणार आहे.त्या अनुषंगाने इच्छुक गोशाळेनी विहीत नमुन्यातील अर्ज  दि.06 एप्रिल-2022 च्या संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत संबधित पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती यांच्यामार्फत  जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, आनंद नगर,  जनावराच्या दवाखाना परिसर, उस्मानाबाद या कार्यालयात प्रस्ताव सादर करावा.

 योजनेचे उददेश, लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी आणि शर्ती, लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहीत नमुन्यातील अर्ज अनुशंगिक कागदपत्रे इ.बाबतची सविस्तर माहिती www.ahd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.

 
Top