उस्मानाबाद / प्रतिनिधी-

न्यायालयीन प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणेआणि दिवाणी दावे सामंजस्याने मिटविण्याबाबत महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तर्फे राज्यभरात 12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षकारांनी आपल्या प्रकरणात विनंती अर्ज लवकर सादर करावा आणि प्रकरणे सामंजस्याने तात्काळ मिटवावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही.एस यादव यांनी केले आहे.

  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन यावर्षी 12 मार्च,7 मे, 13 ऑगस्ट आणि 12 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात येणार आहे .


 
Top