उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शाहू पाटोळे लिखित “खिळगा” पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्रा. ए. डी. जाधव, अखिल भारतीय मराठी प्रकाशन परिषदेचे अध्यक्ष के. एस. अतकरे, मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, प्रकाशक जीवन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी मसाप उस्मानाबाद शाखेच्या वतीने लेखक शाहू पाटोळे, प्रकाशन परिषदेचे अध्यक्ष के. एस. अतकरे यांचा सत्कार करण्यात आला. हे पुस्तक औरंगाबाद येथील मीरा प्रकाशनच्या वतीने काढण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. राज कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन रवी केसकर यांनी तर आभार दौलत निपाणीकर यांनी मानले. औषध भवन येथील सभागृहात संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, एम. डी. देशमुख, अॅड. देविदास वडगावकर, जिल्हा माहिती अधिकारी भंडारी, प्रसाद आतनूरकर, राजेंद्र अत्रे, अशोक सावंत, प्रताप देशमुख, रवी निंबाळकर, कमलाकर कुलकर्णी, गणेश शिंदे, राजाभाऊ नाईकनवरे, राज ढवळे, मित्रजित रणदिवे, सन्जॉय मैंदर्गी, रमेश पेठे, आशिष लगाडे, विकास कांबळे, राजाभाऊ वैद्य, शिलाताई उंबरे, शिवाजी सरडे, माधव इंगळे, डी. के. शेख, पी. डी. कांबळे, के. व्ही. सरवदे यांच्यासह साहित्यप्रेमी, नागरिक उपस्थित होते.

 
Top