उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील  पाडोळी (आ) गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष   शरदचंद्र पवार  हे रविवारी दि. ६ मार्च २०२१  रोजी   येत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी दिली.

सलगर पुढे बोलताना सलगर म्हणाल्या की,   पाडोळी(आ) जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष   शरदचंद्र पवार  यांच्या हस्ते होणार आहे. तरी   जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी प्रेमी, पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, आणि नागरिकांनी  मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केले आहे. 

 
Top