परंडा /प्रतिनिधी:-

परंडा तालुक्यातील मुगाव शिवारातील पुलाजवळ दोन पुरुष अवैधरित्या तलवारी व गुप्त्या ही शस्त्रे बाळगुन असल्याची गोपनीय खबर अंबी पो.ठा. च्या सपोनि-  आषिश खांडेकर यांसह पथकास  मिळाली.यावर पथकाने लागलीच नमूद ठिकाणी धाव घेतली असता तेथे चिखलवाडी, गुरुद्वारा गेट क्र.1, नांदेड येथील जयदीपसिंग गर्जनसिंग बरगुजरा व जितेंद्रसिंग गर्जनसिंग बरगुजरा हे दोघे   दोन तलवारी व तीन गुप्त्या ही शस्त्रे अवैधरित्या बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने तेथे थांबलेले असल्याचे मिळुन आले. यावर पथकाने नमूद शस्त्र व एका मोटारसायकलसह त्या दोघांना ताब्यात घेउन अंबी पो.ठा. चे पोलीस अंमलदार- गजानन मुळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द अंबी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 16 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 34 व शस्त्र अधिनियम कलम- 4, 25 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

 
Top