उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील ग्रामदैवत श्रीकपालेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त सामुदायिक संस्कृतमधील श्री शिवमहिम्नाचे पठण करण्यात आले. प्रारंभी श्रीकपालेश्वराल पुष्पमाला अर्पण करून मानसपूजा स्रोत्राचे पठण केले. यज्ञमार्तंड श्री सेलूकर महाराजांच्या हस्ते महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाजांना पुष्पांजली अर्पण करून प्रेरणा मंत्राचे पठण केले. शामराव दहिटणकर यांनी श्री यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांचा सपत्नीक सत्कार केला त्यानंतर समर्थनगर, गवळीवाडा (उंबरेकोठा), स्वप्नविहार कॉलनी, आनंदनगर इत्यादि ठिकाणच्या महिलांनी रामकृष्णहरी सत्संग मंडळातीत सदस्यानी असे एकूण सत्तर जणांनी सामुदायिक शिवमहिम्नाचे अतिशय सुस्वर पद्धतीने पठण केले त्या वेळी दर्शनास आलेले भाविकही यात सहभागी झाले होते. अशा प्रकारची सामुदायिक उपासना केल्यामुळे तेथील वातारण प्रसन्न झाले व सहभागी साधकांना आत्मिक समाधान लाभले.

या प्रसंगी बोलताना शामराव दहि टणकर म्हणाले अशा सामुमिक उपासनेची आज नितांत गरज आहे. त्या मुळे इतरांनारी सहभागी होण्याची प्रेरणा मिळते. वैयक्तिक पातळीवर आध्यात्मिक शांती व सात्विक आनंद प्राप्त होतो. कार्यक्रमास मंडळ रामकृष्णहरी सत्संगाच्या सदस्यांनी, ऋषिकेश जयकर, बालाजी गुरव ,

सार्थकी वाघ , नलुताई मालखरे, बंडोपंत जोशी,  सहकार्य केले  कुमार व्यास यांच्या . वाढदिवसानिमित्त पू. सेलूकर महाराजांच्या हस्ते सत्कार सत्संग मंडळाच्या वतीने केला  संजय ठाकरे यांनी सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

 
Top