तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील आप्पासाहेब पाटील तालुका नागरी सहकारी पतसंस्थेची  रविवारी विशेष सभा संपन्न झाली. या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. या सभेत 2022 ते 27 या सालासाठी चेअरमनपदी ॲड. धीरज आप्पासाहेब पाटील व व्हाईस चेअरमनपदी सुजित नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 यावेळी संचालक धर्मराज   पाटील, गुरुनाथ बडुरे, सदानंदराव, संतोष  पवार, ज्योतीराम  सुरडकर, प्रमोद गायकवाड, सुरेश  बडोदकर, सत्यजित पाटील, सौ.महानंदा केवटे, लालमहमद तांबोळी, अँड.अरविंद  बेडगे उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे प्रसाद खामकर, फिरोज शेख, समाधान महाबोले, सोमनाथ स्वामी, निरंजन पाटील, विवेकानंद स्वामी, सुहास पुराणिक उपस्थित होते.


 
Top