तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मधील दिव्यांग व्यक्तीचा 5% निधी खर्च करण्यात यावा व अन्य विविध मागण्यांचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने  गटविकास अधिकारी मरोड यांना सोमवार दि.२१रोजी तालुकाध्यक्ष शशीकांत मुळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. 

 यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शशीकांत मुळे, जिल्हा सचिव  महादेव चोपदार, जिल्हा उपाध्यक्ष  महेश माळी, तालुका उपाध्यक्ष   मारुती पाटील,  तुळजापूर शहर अध्यक्ष  नागेश कुलकर्णी, नळदुर्ग शहर अध्यक्ष   गुलाम फकिर,  मुकेश जाधव,  विलास कोरे, महादेव सोनवणे तसेच प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 
Top