तुळजापूर  / प्रतिनिधी-

  महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात  दोन वर्षानंतर प्रथमच  मंगळवार दि.२२रोजी  सकाळी रंगोत्सव पारंपारीक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी प्रथमता देविजीस  दुग्धअभिषेक करण्यात आला. त्यानंतर शुभ्र रंगाचे वस्ञ नेसविण्यात आल्यानंतर सुवर्ण अलंकार घालण्यात आले. नंतर देविजीची आरती करण्यात येवुन अंगारा काडून  देविजींच्या चेहऱ्यास विविध  रंग लावण्यात आल्यानंतर सप्तरंग देविजींच्या वस्ञांवर शिंपडण्यात आल्यानंतर  सर्वञ रंगपंचमी खेळण्यास आरंभ झाला .

येथील शंभुमहादेव मुदगुलेश्वरास रंगपंचमी निमित्ताने रंगाची आकर्षक सजावट केली होती.रंगपचमीनिमित्ताने श्रीतुळजाभवानी मातेस आज  बेसन पीठ, कांद्याची पातीपासुन बनवलेल्या पुर्णावळीचा  नैवध दाखविण्यात आला. आज मंदीरात देविजींचा अंगावर रंग शिंपडल्यानंतर भाविक, पुजारी, मंदीर कर्मचारी यांनी ऐकमेकांना पर्यावरण पुरक कोरडा रंग लावुन रंगपंचमी खेळुन साजरी केली. 

 
Top