उस्मानाबाद / प्रतिनिधी

मराठा स्वराज्याचा झेंडा अटकेपार नेणारे हिंदवी स्वराज्य विस्तारक महान मराठा सेनापती मावळाधीराज गौरव शाली होळकर राज्य संस्थापक धनगर कुलभूषण श्रीमंत मल्हारराव होळकर,यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात 52 लढाया केल्या आणि 51 लढाया जिंकल्या असा कर्तुत्ववान सेनापती हा मराठेशाहीला लाभला. ज्या पद्धतीने पेशवा बाजीरावांचा पराक्रम मोठ्या शौर्याने सांगितला जातो पण त्याच पेशव्यांसोबत श्रीमंत मल्हारराव होळकर हे मोठ्या शौर्याने मोठ्या पराक्रमाने लढत होते आणि मराठेशाहीचा झेंडा अटकेपार नेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची गौरव गाथा ही मल्हारराव होळकरांचे नाव घेतल्या शिवाय पूर्ण होणार नाही. मल्हारराव होळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्य चालवायचे, अशा गौरवशाली मल्हाराव होळकरांच्या जयंतीनिमित्त हा मूर्ती पूजनाचा कार्यक्रम पार पडला. 

यावेळी मा.नगराध्यक्ष दत्ता (आप्पा) बंडगर, मला आर्मी संस्थापक सुरेश (भाऊ) कांबळे एड. खंडेराव चौरे, नगरसेवक सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, सचिन शेंडगे, इंद्रजीत देवकते, बालाजी वगैरे, लिंबराज डुकरे, अशोक देवकते, शाम तेरकर,गणेश एडके, अरविंद देवकते, ओमकार देवकते, शुभम देवकते, हर्षद ठवरे, नवनाथ सोलंकर,आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी जनमोर्चा शहराध्यक्ष नरसिंह लक्ष्मण मेटकरी यांनी केले.


 
Top