उस्मानाबाद / प्रतिनिधी

जनतेच्या आंदोलनाला यश आले असून शहरातील जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात झाली आहे. आज (दि.16) नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे व स्थानिक रहिवाशांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करुन कामाचा शुभारंभ करण्यात आला. खड्डे आणि धुळीच्या त्रासापासून मुक्तता होणार असल्याने स्थानिक रहिवाशी महिलांच्या वतीने मुख्याधिकारी श्री.येलगट्टे यांचे औक्षण करुन सत्कार करण्यात आला. तर नागरिकांनीही पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

बार्शी नाका, जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मोठमोठे खड्डे आणि प्रचंड धुळीच्या लोटामुळे या मार्गावरुन प्रवास करणार्‍यांचे मोठे हाल होत असल्याने नागरिकांनी वेळोवेळी निवेदने देऊन, आंदोलन करुन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी लावून धरली होती. दोन आठवड्यांपूर्वीच या भागातील नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. 

मुख्याधिकारी श्री.येलगट्टे यांनी भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात येणार नाही, तरी देखील विशेष बाब म्हणून जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात येईल, असे आश्वासन नागरिकांना दिले होते. त्यानंतर आज (दि.16) नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे व स्थानिक रहिवाशांच्या हस्ते जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व जेसीबी मशिनचे पूजन करत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या कामामुळे नागरिकांची होणारी हेळसांड थांबणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. असंख्य महिलांच्या वतीने मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे साहेबांचे औक्षण करून शेकडो नागरिकांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला...गेल्या अनेक वर्षा पासून रखडत आलेल्या जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्ता आज जिजाऊ चौक येथे नगरपरिषद मुख्याधिकारी मा. श्री हरिकल्याण यलगट्टे यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन जनतेला दिलेला विश्वास सार्थ ठरवत आज अखेर या रस्त्याचे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत कामाचे भूमिपूजन करण्यात आले....या ऐतिहासिक क्षणाच्या वेळी असंख्य नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे, प्रितम मुंडे, धनंजय शिंगाडे, पांडुरंग लाटे, नंदकुमार शेटे, उल्हास उंबरे, प्रा.डॉ.चंद्रजित जाधव, राजाभाऊ मुंडे, मोहन मुंडे,  दिनकर पाटील, नारायण शेळवणे, अलीम अत्तार, आनंद विधाते, दिगंबर दीक्षित, अभिराम पाटील, मनोज मुदगल, रवींद्र अंबुरे, शेषेराव उंबरे, श्याम कदम, उमेश वैद्य, गजानन जगदाळे, अनिल वाघमोडे, अमित उंबरे, सुनील पंगुडवाले, अभिजीत पतंगे, दिनकर मुंडे, कुणाल कर्नवर, वैभव मुंडे, राहुल बचाटे, रोहन मुंडे, सुभाष शेळके, सुखदेव ढवळे, श्यामभाऊ कुलकर्णी, शशिकांत भोसले, विजयकुमार म्हेत्रे, बुबा उंबरे, माणिक राठोड, मनोज लोंढे, सुरज वडवले, रोहित देशमुख, सचिन राऊत, काशीनाथ राजपूत, बिभीषण गाडे, अजिंक्य मुदगल, अर्चना अंबुरे, करुणा मैंदरकर, पंचफुला घुटे, चंपाबाई ढवळे, सुनंदा म्हेत्रे,  रंजना मुंडे, रमा दीक्षित, ऋतुजा मुंडे, मालन ढवळे, रेखा गाडे, कविता माने, सविता सातपुते, उमा गिरगावकर, सुवर्णा इंगळे, जनाबाई चव्हाण, स्वाती सातपुते, आशा सातपुते, नेहा मैंदरकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top