मुरुम/प्रतिनिधी : 

अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे ५४ वे वार्षिक अधिवेशन रविवारी (ता.२०) रोजी उद्यान विभाग, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. 

या अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत भाई पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लालासाहेब पाटील हे असणार आहेत.

 स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कारसाठी उस्मानाबाद जिल्हातील तीन शिक्षकांची निवड झाली आहे. यामध्ये श्री विनायक महादेव माने (मुख्याध्यापक, श्रीराम माध्यमिक विघालय, धोत्री), हिरालाल व्यंकटराव पवार (सहशिक्षक, श्री ज्ञानेश्वर विघालय, तुरोरी), बंडू पांडूरंग डोंबाळे (सहशिक्षक, इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय, मंगरुळ) असून यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर अधिवेशनाचे नियोजन खालीलप्रमाणे सकाळी ८ ते १० सभासद नोंदणी, ११ ते १२.३० उद्धाघाटन व पुरस्कार वितरण सोहळा, दुपारी १२.३० ते  १.३० भोजन, १.३० ते ३.०० निवडणूक कार्यक्रम, ३.०० ते ५.०० सर्वसाधरण सभा, सभेनंतर अधिवेशनाची सांगता होईल. 

अधिवेशन स्थळ, उद्यान कार्यालय, १८१२/१ ब, सदाशिव पेठ, पुणे या एक दिवशीय अधिवेशनासाठी साने गुरुजी कथामालेच्या सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय उपाध्याक्ष सुनील पुजारी, जिल्हाध्यक्ष डी. के. कुलकर्णी, उपाध्यक्ष एस. वाय. जाधव, कोषाध्याक्ष सुदर्शन शिंदे, शिवशंकर जळकोटे, प्रदीप कदम, बसय्या स्वामी, मार्गदर्शक एम. डी. देशमुख, सुरेश टेकाळे, बालाजी तांबे, बाबुराव चव्हाण, रामचंद्र आलूरे आदींनी  केले आहे.


 
Top