उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आलेल्या शेणा-खांग्रेस आणि भ्रष्टवादीच्या नेतृत्वाखालील सर्वसामान्य जनता, विद्यार्थी आणि शेतकरीविरोधी महाभ्रष्ट आघाडी सरकारची होळी करुन भारतीय जनता पार्टीच्या वतीने   अनोखे आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्य जनतेचे, विद्यार्थ्यांचे, शेतकर्‍यांचे जगणे मुश्किल करणार्‍या महाभ्रष्ट आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला

 प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय येथे झालेल्या या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, अभय इंगळे, प्रविण सिरसाठे, दाजीअप्पा पवार, नरेंद्र वाघमारे ,शेशेराव उंबरे ,संदीप इंगळे, प्रीतम मुंडे,राज निकम, श्रीराम मुंबरे, मेसा जानराव, उदय देशमुख, मोहन मुंडे, प्रसाद मुंडे, वैभव हांचाटे, अमोल पेठे, सुनिल पंगुडवाले, मनोजसिंह ठाकुर, अर्जुन पवार, नरसिंग लोमटे, जगदिश जोशी, विशाल पाटील, ज्ञानेश्वर सुळ, अमित कदम, सागर दंडनाईक, स्वप्निल नाईकवाडी, सुजित साळुंके, अजय यादव, सार्थक पाटील, अजय उंबरे,मनोजसिंह ठाकूर, सायासराव मुंडे,ऋषीकेश शिंदे, तात्याराव शिंदे, आदींसह भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top