परंडा / प्रतिनिधी : 

तालूक्यातील खासगाव येथिल ईनामी जमीन गट नंबर ५१ व ५४ मधील ८० आर जमीन खरेदी विक्री साठी तत्कालीन प्रभारी तहसिलदार वाबळे यांनी बेकायदेशीर ना हरकत प्रमाण दिल्याचा आरोप करण्यात आला असुन  वाबळे यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे .

 दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने  तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खासगाव येथिल ईमामी जमीन गट नंबर ५१ व ५४ मधील ८० आर जमीने ची खरेदी विक्री करन्या साठी नायब तहसिलदार वाबळे यांच्या कडे पदभार असताना  तहसिलदार पदाचा दुरुपयोग करून  शासनास नजराना रक्कम भरून न घेता  दि.२० ऑगष्ट २०२१ना हरकत  प्रमाणपत्र दिले . तसेच ईनामी जमीन वर्ग २ असताना वर्ग १ मध्ये रूपांतरीत केली आहे असा आरोप करन्यात आला आहे. सध्या परंडा येथे नायब तहसिलदार पदावर कार्यरत असलेले सुजित वाबळे यांची खाते निहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करन्यात आली आहे . दिलेल्या निवेदनावर उमेश सोनवणे , असद  दहेलूज, साजिद मुजावर ,स्वप्नील कांबळे , अरविंद सोनवणे , मिलींद बनसोडे , रोहन बनसोडे , सागर बनसोडे , सुजल बनसोडे , पिंटू गोठे , यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .


 
Top