मुरूम, (प्रतिनिधी) :  

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती शनिवारी (ता. १२) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

या यावेळी तुळजापूरचे प्रा. डॉ. आंबादास बिराजदार, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. रवी आळंगे, डॉ. निलेश शेरे, डॉ. जगदीश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र, राज्यशास्त्र संशोधन केंद्र व पदवी-पदव्युत्तर विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्यशास्त्र विषयाचे संशोधक मार्गदर्शक डॉ. महेश मोटे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी यशवंतराव चव्हाण यांचे कार्य व त्यांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी व्यासपीठावर प्रा. सुजित मठकरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र आळंगे, केंद्रसंयोजक  डॉ. सुभाष हुलपल्ले उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ. सुशील मठपती, डॉ. नरसिंग कदम, डाँ. विलास खडके, डॉ. संध्या डांगे, प्रा. दिनकर बिराजदार, प्रा. अशोक बावगे, प्रा. सचिन राजमाने यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ. दयानंद बिराजदार, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. अविनाश मुळे, डॉ. सोमनाथ बिरादार, मशाक कागदी, श्रावण कोकणे, लाल अहमद जेवळे आदींनी पुढाकार घेतला. होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन राजमाने तर आभार केंद्रसंयोजक  डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top