तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती व  मल्हार आर्मी द्वितीय वर्धापन दिन तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.16 मार्च रोजी हिंदवी स्वराज्य विस्तारक,श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती  व मल्हार आर्मी संघटना द्वितीय वर्धापनदिन यानिमित्ताने मल्हार आर्मी तुळजापूर यांच्या वतीने   महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरू झाली.

यावेळी बोलताना मल्हार आर्मी,संस्थापक अध्यक्ष श्री.सुर्यकांत कांबळे म्हणाले की, धनगर आरक्षण चळवळ थंडावलेली आहे,मल्हारराव होळकर यांचा आदर्श घेऊन धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी यापुढील काळात मल्हार आर्मीच्या वतीने मोठा लढा उभारणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केले. कार्याध्यक्ष  बाळासाहेब बंडगर म्हणाले की,पक्ष कोणताही असो धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

 यावेळी या कार्यक्रमाला मल्हार आर्मी संस्थापक अध्यक्ष,श्री.सुर्यकांत कांबळे,कार्याध्यक्ष  बाळासाहेब बंडगर,सचिव गणपत देवकाते,जयवंत सलगर यांच्यासह राज्यभरातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मल्हार आर्मी तुळजापूर यांनी अथक मेहनत घेतली. 


 
Top