तुळजापूर/ प्रतिनिधी-  

 महाशिवराञीनिमित्ताने  शंभुमहादेव मंदीरात भाविकांनी शंभुमहादेवाची पुजाअर्चा करुन दर्शन घेण्यासाठी  गर्दी केल्याने शंभुमहादेव मंदीरे दोन वर्षानंतर भक्तांनी फुलुन गेली होती .

श्रीतुळजाभवानी मंदीरातील भवानी शंकर, सिंदफळ परिसरात असणारे श्रीमुदगुलेश्व,  पापनाश मंदीरातील पापनाशेश्वर, रामदरा तलावातील शंभु महादेव, मंगरुळ येथील श्रीकंचेश्वर आदी प्रमुख मंदीरांनमध्ये शंभुमहादेव दर्शनार्थ भाविकांनी  पहाटे पासुन गर्दी केली होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. महाशिवराञीनिमित्ताने शंभुमहादेव मंदीरात मध्ये अभिषेक हरिजागर भजन किर्तन अदि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शंभुमहादेव मंदीरात सुवासनी महिलांनी तुपातील वाती जाळुन शंभुमहादेवाची आराधना केली.

 
Top