उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद  शहरात गंगाधर करंडक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन केले होते त्यासाठी म्हणून नाटय जागर या विषयानुरुप स्मरणिका मुद्रित केली असून यामध्ये मराठवाड्यातील नाट्य चळवळीचा अमुल्य ठेवा तत्कालीन परिस्थिती आजची स्थिती या विषयी स्मरणिकेत जेष्ठ रंगकर्मी यांच्या दिग्गज साहित्य लिहिलेले लेख डॉ. मिलिंद माने यांची लिखित रंगकर्मी संभाजी भोसले, उमेश जगताप मुलाखत असून सदर नाट्य जागर स्मरणिका संग्रही ठेवण्याजोगी आहे . या स्मरणिकेचे मुख्यपृष्ठ श्रीपतराव भोसले हायस्कूलचे कलाध्यापक शेषनाथ वाघ ,रावा ॲडज् उस्मानाबाद यांनी केले असून संपादक डॉ. रुपेशकुमार जावळे संपादक मंडळ राजेंद्र अत्रे, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. कृष्णा तेरकर , डॉ. गणेश शिंदे , डॉ .सुनिता गुंजाळ , आंतर पृष्ठ सजावट संगणक रचानाकार दिपक जाधव यांचा सत्कार नाट्य परिषदेचे सल्लागार डॉ. अभय शहापूरकर, कवी राजेंद्र अत्रे उस्मानाबाद जिल्हा शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे जेष्ठ साहित्यिक कवी माधव गरड,गझल कार कवी युवराज नळे यांच्या हस्ते फेटा, पुष्पहार , स्मरणिका , स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी हनमंत पडवळ, कवी डॉ. शिवाजी गायकवाड, एस. शिंदे , चंदनशिवे ,  प्रदीप गायकवाड , सागर चव्हाण आदि मान्यवर कवी, नाट्य परिषदेचे सदस्य उपस्थित होते . सुत्रसंचालन राजेंद्र अत्रे यांनी केले तर आभार युवराज नळे यांनी मानले .

 
Top