वाशी  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील बनगरवाडी येथील कॉंग्रेस चे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले अमोल बोडके यांची ओबीसी सेल च्या वाशी तालुका अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली .यावेळी सुधीर पोतदार (विभागीय अध्यक्ष मराठवाडा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभाग ) यांनी मार्गदर्शन केले तर ओबीसी विभाग प्रांत अध्यक्ष श्री.भानुदास माळी यांच्या सूचनेनुसार उस्मानाबाद जिल्हा ओबीसी विभागाची आढावा बैठक संपन्न झाली . यामध्ये विविध विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देण्यात आल्या .

 या वेळी उस्मानाबाद ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष काकासाहेब सोनटक्के ,प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग कुंभार ,जालिंदर करडकर ,जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद यांच्यासह पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते .

 
Top