उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन मंगळवार दि.१५ मार्च २०२२ रोजी, मेडसिंगा ता.उस्मानाबाद येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात मेडसिंगा व परिसरातील सर्व वयोगटातील ५५० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन अनुरथ दुधभाते (सरपंच) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे मा.सरपंच रघुराम आगळे, रमन आगळे, ग्रा.प.सदस्य किशोर आगळे, सिध्देश्वर शेलार, पोलीस पाटील काकाजी आगळे, महेश लांडगे, दत्ता रणदिवे, बाबा शित्रे, संदीप पडवळ, सौ. चिंगुताई जाधाव, भाजपा ता.उपाध्यक्ष काकासाहेब शेलार, विनोद आगळे, पोपट आगळे, शहाजी आगळे, बालाजी शित्रे, महादेव कचरे, उध्दव घाडगे तसेच आशा कार्यकत्या व अंगणवाडी कार्यकर्त्या माया गायकवाड, पदमश्री साखरे, अनुषा घेवारे, रांजाबाई खापरे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. धवल रांका, डॉ. राजस चोंडकर, डॉ.आनंद यादव, डॉ. सिध्दांत रेळेकर, डॉ. परवीन सय्यद यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, ‍निरंजन लोकरे, पवन वाघमारे, रवी शिंदे, नाना शिंदे ईत्यादींनी परीश्रम घेतले.


 
Top