तेर / प्रतिनिधी 

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील  नागरीक व ग्रामपंचायत सदस्यांना अरेरावी करत कामात कुचराई करणाऱ्या प्रभारी ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी यांची बदली करून पुर्ण वेळ ग्रामसेवकांची नियुक्ती करण्याची मागणी ग्रा.प. सदस्यांनी  गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे .

उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामपंचायत ही लोकसंख्येने मोठी ग्रामपंचायत असून सध्याचे ग्रामसेवक पुर्ण वेळ थांबत नाहीत त्यामुळे त्याची बदली करून पुर्ण वेळ काम करणाऱ्या ग्रामसेवक देण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मंगेश पांगरकर यांच्यासह 9 ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे केली आहे .

गावची लोकसंख्या मोठी असल्याने नागरिकांना सतत कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात यावे लागते त्यामुळे पुर्ण वेळ ग्रामसेवकाची आवश्यकता आहे. सध्याचे ग्रामसेवक प्रशांत नाईकवाडी हे दिवसातून एक दोन तासच ग्रामपंचायत मध्ये थांबत असून ग्रामपंचायत सदस्यांना व नागरिकांना अरेरावीची भाषा वापरीत असून कामात कुचराई करीत आहेत .

सध्याच्या ग्रामसेवकाची बदली करून पुर्ण वेळ ग्रामसेवक देण्यात यावा. अशी मागणी ग्राप सदस्य मंगेश पांगरकर यांनी गटविकास अधिकारी प.स.उस्मानाबाद यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर माजी उपसरपंच बाळासाहेब कदम ,  मजिद मणियार , ग्राप सदस्य अनिता नाईकवाडी , मडूबाई भक्ते , कमलबाई थोडसरे , निता माने , रमाबाई वाघमारे , इर्शाद मुलांनी  आदिच्या सह्या आहेत.


 
Top